शाळा तेथे ग्रंथालय'उपक्रमातंर्गत दुर्बळ्या विद्यालयात ग्रंथालयाचे उदघाटन -युवकमित्र परिवाराचा उपक्रम-

'


शिरपूर -राज्यात वाचन चळवळ राबविणाऱ्या युवकमित्र परिवार नंदूरबार या चळवळीमार्फत 'शाळा तेथे ग्रंथालय उपक्रमांतर्गत आई बीजासनी देवी माध्यमिक विद्यालय दुर्बळ्या ता.शिरपूर येथे ग्रंथालय स्थापन करण्यात आले.माजी समाजकल्याण सभापती वसंत पावरा यांच्या हस्ते वाचनालय उदघाटन करण्यात आले.यावेळी शाळेला युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी ११० वाचनाची पुस्तके प्रदान केली.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच देवादादा पावरा हे होते.तर  प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप पावरा,पोलीस पाटील लवकुश पावरा,प.स.सदस्य पिंकीबाई पावरा,लताबाई पावरा, द्वारकाबाई पावरा,श्रावण पावरा,गब्बरसिंग पावरा,तोताराम पावरा,श्रावण पावरा यांच्यासह ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.
      कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नचिकेत पवार,शिक्षक अरविंद पाटील,जगदीश पाटील,अमोल सोनार,गोपाल सोनार,श्रीराम जाधव,संदीप देवरे,भिकेश पावरा शिक्षिका मोहिनी पाटील यांचे सहकार्य लाभले.यावेळी शिक्षिका गायत्री पाटील यांनी वाचन चळवळ व ग्रंथाचे महत्व पटवून दिले.सूत्रसंचालन मोहन हेमाडे यांनी केले तर शिक्षिका सुनंदा बडगुजर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने