माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक गटात काव्यलेखन स्पर्धेत प्रांजल सोनवणे हिचे सुयश....



प्रजासत्ताकदिनी धुळ्याचे पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार...


शिरपूर - माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांच्या स्तरावर या  तीन गटांमध्ये निबंध स्पर्धा,काव्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर तिन्ही गटांमध्ये व तिन्ही उपक्रमांमध्ये प्रथम,द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.हा सोहळा भारतीय प्रजासत्ताकाच्या 71 व्या वर्धापनदिनाच्या औचित्यावर साजरा झाला.यात जिल्हा स्तरावर प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना मा.ना.श्री.अब्दुल नबी सत्तार सो.राज्य मंत्री महसूल व ग्रामविकास, बंदरे, खार जमीन विकास,विशेष सहाय्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धुळे जिल्हा
यांच्या शुभहस्ते जिल्हा क्रीडा संकुल  धुळे येथील क्रीडांगण, देवपूर,धुळे येथे होणार आहे. सदर स्पर्धेत प्राथमिक गट अ काव्यलेखन स्पर्धेमध्ये शिरपूर येथील आर .सी .पटेल प्राथमिक शाळा शिरपूर या ठिकाणी इयत्ता चौथी या वर्गात शिक्षण घेणारी प्रांजल अमोल सोनवणे हिने  गट अ  मध्ये जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवलेला आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी सन्मान पत्र व पुस्तक भेट देण्यात आले. सदर कार्यक्रमास कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता मास्क लावणे,सामाजिक अंतर ठेवण्याबाबतच्या सूचना कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच संबंधित विभागाला देण्यात आलेल्या होत्या सदर विद्यार्थिनीच्या यशाबद्दल आर. सी.पटेल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार  अमरीशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, शिरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपालजी भंडारी, सचिव प्रभाकररावजी चव्हाण , कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, विवेक लोहार
आर.सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे सी. ई .ओ डॉक्टर उमेशजी शर्मा, शाळेचे मुख्याध्यापक सी .डी .पाटील, वर्गशिक्षक संदीप चौधरी,शाळेतील शिक्षक बंधू भगिनी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. व भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने