शिरपूर : तालुक्यातील गरताड या ग्रामपंचायतीमध्ये भाजपा प्रणित पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन माजीमंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, सुतगिरणी चेअरमन भुपेशभाई पटेल यांचा मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतमध्ये भाजपाची एकतर्फी सता आली आहे. तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या गरताड ग्रामपंचायतीवर माजी सरपंच अशोक सोनवणे, रमेश पाटील, पंकज बागुल, राकेश सोनवणे, माजी उपसरपंच सर्जेराव शिंदे यांच्या भाजपा प्रणित पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडविला. या निवडणुकीत भाजपाचे पॅनल विरोधात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पॅनल अशी सरळ लढत होती. ही लढत प्रतिष्ठेची व अटीतटीची होईल असे वाटत होते. परंतु निकालात भाजपाच्या पॅनलचे ७ पैकी ७ जागा निवडुन आल्यात. ही लढत एकतर्फी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अनेक जागा या खूप मोठ्या फरकाने निवडून आल्याबद्दल गरताड येथे शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, हिंगोणी भाजपा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा हस्ते नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्या सौ. मंगला मोरे, सौ. सुनंदा ठाकरे, सौ. कल्पना कोळी, सौ. अनिता बाविस्कर, श्री. गोरख पिंगळे, ज्ञानेश्वर ठाकरे, करण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक पाटील, बन्सीलाल शिंदे, महेंद्र शिंदे, युवराज मोरे, सारीष सोनवणे, हेमराज मोरे, सुनिल सोनवणे, रविंद्र कोळी, गोकुळ बाविस्कर, नथ्थु ठाकरे, नितीन शिंदे आदिंची उपस्थिती होती सुत्र संचालन व आभार दिनेश ठाकरे यांनी मानलेत.
Tags
news
