स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान यशस्वी करून शिरपूर शहर नंबर 1 करण्याचे नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांचे आवाहन




शिरपूर : स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान यशस्वी करून शिरपूर शहर नंबर 1 करावे. यासाठी शिरपूर शहरातील सर्व नागरिकांंनी सहकार्य करावे. शेजारी, घरातील सर्व सदस्य यांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करावे. स्वच्छते बाबत सर्व दुकानदार यांनीही स्वच्छता राखून आपले कर्तव्य बजवावे. सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी महिला भगिनी यांनीही साथ द्यावी तसेच स्वच्छता अभियान फीडबॅक सर्वांनी भरावा व माझी वसुंधरा बाबत ऑनलाईन माहिती भरावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांनी केले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याबाबत नगरसेवक, नगरसेविका, शहरातील नागरिक, पदाधिकारी यांची मिटिंग आर. सी. पटेल शिक्षण संकुलातील एस. एम. पटेल ऑडिटोरियम हॉल येथे रविवारी दि. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी सर्वांनी हरित शपथ घेऊन सर्वांनी मिळून अभियान यशस्वी करण्याचे आश्वासन दिले.

मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी यावेळी सविस्तर विवेचन करतांना सांगितले, स्वच्छता राखणे आपले सर्वांचे काम आहे, नगरपरिषद काम करेलच पण सर्व जनतेचे देखील कर्तव्य आहे. झाडे लावा, झाडे जगवा. आपल्यासाठी व  पुढच्या पिढीसाठी हे कार्य आपण सर्वांनी करु या. शिरपूर शहराचा नंबर प्रथम येण्यासाठी प्रयत्न करु या. शिरपूर शहर आपले सर्वांचे आहे, आपण सर्वांनी दृढनिर्णय घेऊ या. आपले हे काम नियमितपणे करुन कायमस्वरूपी ही सवय अंगीकारू या. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गेल्या वर्षी शिरपूर शहर पश्चिम भारतात 6 व्या क्रमांकावर, राज्यात 6 वा क्रमांकावर होते, मात्र यावर्षी प्रथम क्रमांक येण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत. महाराष्ट्र शासनाने पर्यावरण संतुलन साठी "माझी वसुंधरा अभियान" सुरु केले आहे. शहरात काही कामानिमित्त जातांना आठवड्यात बुधवारी एक दिवस "नो वेहिकल डे" पाळावा व सायकल वापरा, याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून पर्यावरणाला देखील फायदा आहे. सायकल रॅली काढावी, लोकेशन फोटो काढणे, त्यात तारीख, ठिकाण नोंद होते.माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी तालुक्यात पाण्याचे फार मोठे काम केले आहे. आपण सर्वांनी गाफील न राहता मनापासून पाणी बचत करावी, पाण्याचे संवर्धन करु या, पावसाचे घराच्या छतावरील पाणी जमिनीत पाईप द्वारे सोडणे, पाण्याची साठवणूक करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे, काहींनी घरी सोलर प्लांट लावले आहेत, ते सुद्धा उपयुक्त आहे, निसर्गाच्या ऊर्जेचा वापर करणे सर्वांसाठी फायदेशीर आहे. जास्तीत जास्त लोकांनी
हरित शपथ घ्यावी, जेणे करुन शिरपूर स्वच्छता अभियान साठी शिरपूर शहराला जास्त गुण मिळतील, ई-प्लेज (Epledge) बाबत ऑनलाईन माहिती भरावी. तसेच शिरपूर वरवाडे नगरपरिषद, शिरपूर स्वच्छ सर्वेक्षण 2021 बाबत फीडबॅक भरणे बाबत नागरिक यांनी सहभागी व्हावे व सहकार्य करावे. देशातील एकमेव उपक्रम गाय की रोटी उपक्रम शिरपूूूर येथे सुरु असून
शासनाचे कोणतेही अभियान हा नुसता शासनाचा कार्यक्रम न राहता नागरिक चळवळ व्हावी. बाजारपेठेत
घंटागाडी दोनदा पाठविण्यात येईल, कृपया दुकानदार यांनी कचरा रस्त्यावर किंवा बाहेर कुठेही टाकू नये असेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने