नाशिक शहरातील खाजगी सावकारांवर आळा घाला व लाईट कनेक्शन कट करु नये-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे याची निवेदनद्वारे मागणी



शांताराम दुनबळे 
*नाशिक-:आज दिनांक 25/1/2021 सोमवार रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे निवासी जिल्हाधिकारी श्री. भागवत डोईफोडे यांची भेट घेऊन वरील विषयाअंतर्गत निवेदन देण्यात आले 

मागील आठवड्यात बौध्द तरुण बबन शिंदे ह्या तरुणानाला खाजगी सावकार आबा चौधरी व त्याच्या सहकारी गुंडानी शिंदे यास बेदम मारहाण करुन जातीवाचक शिविगाळ केली त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल असून हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्या तसेच सध्या गोरगरीब नागरिकांना   महवितरण वीज  कार्यालयातुन फोन येताहेत की लाईट बिल भरा अन्यथा कनेक्शन कट करू तरी सो.पुढील आदेश होईपर्यंत कनेक्शन कट करू नये आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे 

याप्रसंगी रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, रिपाई येवला तालुका अध्यक्ष गुड्डभाई जावळे,युवा नेते सुरेशभाऊ जाधव,युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे, सागर जाधव, विनोद शिंदे,मुकेश जावळे, प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने