दौंड
पुणे शहराचे उपनगर होत असलेल्या दौंड तालुक्यातील यवत व राहु येथुन पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस सेवा आजपासुन सुरु झाली
सकाळी यवत येथे फुलांनी सजविलेल्या बसचे नागरिकांनी स्वागत केले
बसचे कर्मचारी यांच्या हस्ते पुजा करण्यात आली
बसचे चालक रामदास शिंदे व वाहक राहुल कुटे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जनार्दन चांदगुडे यांनी बस सुरु झाल्याने ज्येष्ठ नागरिक , विद्यार्थी , नोकरदार ,शेतकरी यांना हक्काची सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त केले
पहिल्या दिवशीच बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळाला
यावेळी महामंडळाचे परिसरातील कर्मचारी, विद्यार्थी ,नोकरदार व प्रवाशी उपस्थित होते
Tags
news
