पैशांची परतफेड टाळण्यासाठीच माझ्यावर खोटा आरोप, एसआरबी स्कूल चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर यांचा खुलासा






 शिरपूर -  मी डॉ.धीरज तुकाराम बाविस्कर दहिवद ता.शिरपूर येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूलचा चेअरमन आहे. माझ्या आस्थापनेत एकूण 68 कर्मचारी असून त्यात 41 महिलांचा समावेश आहे. माझ्यावर असा घाणेरड्या स्वरुपाचा आरोप होण्याचा हा पहिलाच प्रसंग उद्भवला आहे.

आपल्या अवाजवी मागण्या दहशतीच्या मार्गाने मान्य करुन घेण्यासाठी संस्थाचालकांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपण घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत, ज्याचे पैसे घेणे आहेत त्याने ते सोडून द्यावेत या स्वार्थी हेतूने संस्थाचालकांवर दहशत बसवण्याच्या हेतूने हा आततायीपणाचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण स्त्री बसल्याचाही बिनदिक्कत गैरवापर होत आहे. या प्रकरणात मी झुकल्यास किंवा शरणागती पत्करल्यास अशी प्रवृत्ती फोफावेल म्हणून मी पोलिस यंत्रणा व न्याय संस्था यावर अतूट श्रद्धा आणि विश्वासाने या प्रकाराला तोंड देणार आहे.  व सदरचा लढा न्यायालयात लढणार आहे . मात्र  इतर संस्थाचालकांवरही असा प्रसंग आणतील व संस्थाचालकांना अशा प्रवृत्तींचे मिंधे बनून राहावे लागेल.

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण सोकावतो. सध्या एव्हढेच, कारण प्रकरण पोलिसात प्रलंबित आहे.

आपला विश्वासू
डॉ.धीरज तुकाराम बाविस्कर

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने