दौंड तालुक्यातील यवत येथे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने श्रीमती सोनीया गांधी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते श्री शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ..
यावेळी प्रामुख्याने काँग्रेस जेष्ठ नेते माजी राज्य मंत्री श्री बाळासाहेब शिवरकर व शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख श्री महेश पासलकर.
यांनी भेट दिली .
कार्यक्रम आयोजन दौंड तालुका अखिल भारतीय काँग्रेस च्या वतीने केल्याचे तालुका अध्यक्ष श्री विठ्ठल खराडे यांनी मनोगत व्यक्त करताना सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा फार तुटवडा निर्माण झाल्याने हे शिबीर आयोजित केले असल्याचे सांगितले यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्त दान केले त्यांना संजीवनी ब्लड बँक यांच्यावतीने प्रमाणपत्र व पाण्याचे जार भेट देण्यात आले .
यावेळी श्री कुंडलिक खुटवड, दौंड विधानसभा सेल अध्यक्ष श्री विठ्ठल दोरगे, रफिक शेख, अरविंद दोरगे,अशोक दोरगे,संपत फडके,मोसिन तांबोळी,अल्ताफ शेख,श्री मंगेश रायकर व पदाधिकारी उपस्थित होते .
दौंड रोटरी ब्लड बँक,
श्री काळभैरवनाथ देवस्थान, समस्त ग्रामस्थ यवत यांचे विशेष सहकार्य मिळाले
प्रतिनिधी
राहुलकुमार अवचट
दौंड ( पुणे )
Tags
news
