आमदार राजेश पाडवी यांची मतदारसंघातील पहाड पट्टीत भेट




कृष्णा कोळी, शहादा प्रतिनिधी--मो, 9823983435

शहादा तळोदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी साहेब यांनी शहादा तालुक्यातील डोंगर भागातील नागझिरी उमरापाणि, कोटबाधणी या गावांना पाई चालत भेट दिली या वेळी काँग्रेस पक्षात 20 वर्षा पासुन कामकरणारे माजी पंचायत समिती सदस्य शंकर दादा पावरा व उपलापाणी चे कारभारी नोबल्या वळवी व त्यांच्या सह असंख्य कार्यकर्तै व महिलांनी भाजपा मधे प्रवेश केला या गावकरीनी सांगितले कि आमच्या पाडान मधे भारत स्वातंत्र्य झाल्या पासुन कोणतेही लोकप्रतिनिधी खासदार, आमदार, जि.प.सदस्य, आध्याप आमचा भेटीला आले नाही आपण पहिले आमदार आहात की आमचा भेटी साठी पाई चालत आमच्या समस्या अडचणी जाणुन घेतल्या तसेच आमदार राजेश पाडवी साहेब यांनी सांगितले की प्रत्येक पाड्या पर्यंत रस्ते तयार करण्यात येतील व विद्युत पुरवठा लवकर आपल्या पर्यंत पोहचवु व पिण्याच्या पाण्यासाठी नविन विहीरी बनवुन देण्यात येतील आणि रेशनकार्ड, विधवा महिलेस पगार, घरकुल,वृध्दा चा पगार यां साठी कोणालाही अडचणी येत असतील माझ्या संपर्क साधावा तसेच लवकर गावकरी बांधवाचे वनपट्ट्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे बाकी लोकांना भेटले आहेत बाकी प्रलंबित असलेले दावे लवकरच निकाली काढु असे आमदार राजेश पाडवी यांनी या प्रसंगी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल भाऊ चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, पंचायत समिती सदस्य डॉ विजय चौधरी,अदिवासी मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुखलाल रावताळे,माजी सरपंच शंकर पावरा, कारभारी नोबल्या वळवी, कोटबाधणी जगन मोरे, विरसिंग पाडवी गुड्डू वळवी,गोपी पावरा, बाबुलाल पावरा, कांतीलाल पाडवी,गुलाबसिंग भिल, आट्या भिल, दाज्या भिल, रतीलाल भिल, व कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने