क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने covid-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न



धुळे - क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड, नव्य दिशा संस्था व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नगरपालिका हॉलमध्ये आशा वर्कर यांच्यासाठी covid-19 जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. त्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व आशा वर्कर यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
    लॉक डाऊन च्या काळात घराघरात जाऊन लोकांची सेवा करणाऱ्या आशा वर्कर यांना त्यांच्या ज्ञानात भर व्हावी म्हणून नव्य दिशा संस्थेमार्फत तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. Covid-19 ची निर्मिती कशी झाली वायरस कसा पसरला व त्यांच्या साठी सामान्य जनता आशा वर्कर त्यांनी काय काय विशेष काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले सोबत रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवावी लहान मुलं व गरोदर माता यांची काळजी कशी घ्यावी याविषयी देखील डॉक्टर कौस्तुभ साळुंखे डॉक्टर सुजाता साळुंखे डॉक्टर प्रिया मासाने मॅडम यांच्याकडून सफल मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमात धुळे शहरातील किमान शंभर अशा वर्कर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला सोबत त्यांना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड व नव्या दिशा संस्था यांच्यामार्फत मोफत व मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून
मनपा सभापती सुनील बैसाने, मनपा उपायुक्त s.r. गोसावी. मनपा मेडिकल ऑफिसर महेश मोरे, सिविल हॉस्पिटल वैद्यकीय अधीक्षक डॉ अश्विनी भामरे ,CAGL झोनल ऑफिसर श्रीनिवास रेड्डी, आशा वर्कर प्रोग्रम मनेजर डॉक्टर प्रशांत साळुंके, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर कौस्तुभ साळुंके, डॉक्टर प्रिया मसाने, डॉ.सुजाता साळुंखे एरिया मॅनेजर शांताराम बारडोले उपस्थीत होते. सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे, प्रास्ताविक रोहीत नंदाने, आभार मोहसीन कटंनली यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने