राज्यातील ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान आचार संहिता लागू



 मुंबई प्रतिनिधी - राज्यातील 33 जिल्ह्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे त्यासाठी आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी दिले आहे.
मदान यांनी सांगितले आहे की एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते मात्र covid-19 मुळे सदरचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. या सह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र 23 ते 31 डिसेंबर 2012 या कालावधीत स्वीकारली जातील शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. त्यांची छाननी 31 डिसेंबर 2020 रोजी होईल नामनिर्देशनपत्र 4 जानेवारी 2019 पर्यंत मागे घेता येतील व याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 15 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत होईल मतमोजणी 18 जानेवारी 2019 रोजी होईल विधानसभा मतदार संघाची 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या 1 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 7 डिसेंबर 2020 पर्यंतची मुदत देण्यात आली होती त्यानुसार अंतिम मतदार याद्या 14 डिसेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत अशी देखील माहितीही मदान यांनी दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने