मा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शिरपूरला विविध कार्यक्रमांचे आयोजन




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात उद्या दिनांक 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात 12 इम्युनिटी क्लीनिक चा प्रारंभ, महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा, जाणता राजा क्रिकेट करंडक स्पर्धा ,कामगारांना ब्लँकेट वाटप, शहरातील 12 शाखांचे फलक अनावरण तसेच मोफत होमिओपॅथीक रोगनिदान व उपचार शिबीर अशा विविध कार्यक्रम उद्या संपन्न होणार आहेत. याबाबतची माहिती महात्मा ज्योतिराव फुले होमिओपॅथिक महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर मनोज महाजन यांनी दिली आहे. शिरपूर निमझरी रस्त्यावरील होमियोपेथिक महाविद्यालय येथे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे व प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांच्या उपस्थितीत सफर कार्यक्रम संपन्न होणार आहेत .महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ज्योती पावरा सत्यवती पावरा  या महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन करतील. संस्थेच्या सचिव अमृता महाजन हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असतील .अर्जुन टिळे हे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करतील. सुरेश पाटील, युवराज पाटील ,प्रियंका पाटील शिंगवे तालुका शिरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतील. शहर व परिसरातील पक्षांच्या शाखांचे फलक अनावरण राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे अर्जुन टिळे, डॉक्टर जितेंद्र ठाकूर ,डॉक्टर मनोज महाजन यांच्या हस्ते होईल. परिसरातील ऊसतोड कामगारांना शि सा का चे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे ,तालुकाध्यक्ष रमेश कंरकाळ, कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या हस्ते ब्लॅकेट  वाटप करण्यात येईल. ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तमराव महाजन, महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष दिगंबर माळी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती डॉक्टर मनोज महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने