शिरपूर -बलकुवे ता शिरपूर जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत चा गलथान कारभार सन 2012 ते आज पर्यंत बलकुवे येथील तत्कालीन ग्रामसेवक व विध्यमान ग्रामसेवक व सरपंच यांना वेळोवेळी दिव्यांग बांधवांचा हक्काचा ग्रामपंचायत ग्राम निधी तुन मिळणारा तिन टक्के व पाच टक्के निधी वाटप करण्याचा शासन आदेश असताना या निधीचे वितरण केले नाही. आज पर्यंत बलकुवे येथील दिव्यांग बांधवांना कोणतीही निधीचे वाटप केले नसुन तरी त्या निधीचे वाटप न करण्याचे मागे काय गौडबंगाल आहे याची शंका येत आहे व त्यांचे साठी आज पर्यंत कोणतीही शासनाची योजना राबविण्यात आली नाही तरी दिव्यांग बांधव यांना त्यांचा हक्काचा पाच टक्के निधी मिळावा त्यासाठी आज बलकुवे येथील ग्रामपंचायत चे प्रशाशक यांना बलकुवे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते माधवराव फुलचंद दोरीक,गावातील दिव्यांग बांधव एकनाथ भिका कोळी,जगन रतन पाटील यांनी दिव्यांग बांधवांना लवकरात लवकर त्यांचा हक्काचा निधी वाटप करण्यात यावा व शासनाच्या इतर योजना योग्य राबवण्यात याव्यात यासाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनावरती गावातील दिव्यांग व्यक्ती मंगलाबाई माधवराव दोरीक,एकनाथ भिका कोळी,गुलाब चिंधा पाटील ,शांताराम उदराज कोळी ,गुणवंत लुका पाटील ,जिजाबाई कचरु पाटील ,नितीन विजय पवार ,जगदीश मदन मिस्तरी ,शालीक हिलाल पाटील ,रंगराव दौलत पाटील यांनी सह्या केल्या आहेत व ही मागणी केली आहे.
Tags
news
