राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक ठार एक जखमी,शिरपूर तालुक्याच्या युवकांवर काळाचा घाला




शिरपूर प्रतिनिधी  - मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली असून शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावाचा एक तरुण यात मयत झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावर मोटरसायकलने धुळ्याकडे जाणाऱ्या मोटरसायकलला ऊसाने भरलेला ट्रक ने धडक दिल्याने  भीषण अपघात झाला . अपघातामुळे मोटरसायकल वरील आकाश कोळी वय 25 या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत युवक गंभीर जखमी झाला आहे दोन्ही तालुक्यातील थाळनेर गावाचे असल्याबाबत प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे सदरची घटना घडल्यानंतर तात्काळ महामार्गावरील नागरिकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधून अपघाताची माहिती दिली एम एच 06 - 21 11  या वाहनाला नागरिकांनी थांबले होते .जखमी युवकास तात्काळ रुग्णालय धुळे येथे रवाना करण्यात आले होते सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असल्याबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने