इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने डॉक्टरांनी केला विवाहित महिलेचा विनयभंग याप्रकरणी परस्परा विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


नाशिक ,इंदिरानगर वार्ताहर :  इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने वडाळागाव  येथे डॉक्टरांनी एका विवाहित महिलेचा  विनयभंग केल्याची घटना  घडली याप्रकरणी  परस्परा विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोटात दुखत असल्याने  (दि २० रविवार  रोजी  सकाळी ११.४५ वा . च्या सुमारास  परिसरातील सादिक नगर गल्ली नं . ४ वडाळागाव  येथील डॉक्टर मुश्ताक शेख यांच्या दवाखान्यात  पोटात दुखत असल्याने  सदर  विवाहित महिला गेल्या तेव्हा दवाखान्यात डॉक्टरांव्यतिरीक्त इतर कोणीही नव्हते  डॉक्टर शेख यांना  पोट खूप दुखत आहे असे सांगितले  यावर . डॉक्टरांनी  कमरेवर इंजेक्शन घ्यावे लागेल असे सांगितले . तेव्हा त्यांना गोळया द्या किंवा हातावर इंजेक्शन द्या असे सांगितले असता त्यांनी  कमरेवरच इंजेक्शन घ्यावे लागेल असे सांगितले . त्यानंतर  संशयित डॉक्टर शेख यांनी  सदर महिलेशी अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी सदर महिलेने.  घाबरून आरडाओरड केली  असता दवाखान्याच्या समोरील चहाची टपरी  चालवणारे शहनाज शेख,  व त्यांचे नातेवाईक  दवाखान्यात आले  घडलेला प्रकार महीलेना सांगितला असता संशयित डॉक्टरांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला यावेळी डॉक्टरांनी बचावासाठी हातात कैची  घेऊन फिरवली त्यात   दोन जणांना हातावर व पोटावर कैची लागुन दुखापत झाली सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तसेच डॉ मुस्ताक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 
 यांचे मेहबूब नगर गल्ली नंबर 1 येथे  क्लिनिक असुन ते नेहमीप्रमाणे रविवार
(दि२०)  रोजी सकाळी अकरा वाजता क्लिनिक येथे आले असता क्लिनिकच्या बाहेर भिंतीवर इरफान शेख उर्फ चिपडया यांनी त्याचे वर्तमान पत्रात प्रसिद्ध झालेले बातम्यांचे कात्रण लावले होते मुस्ताक डॉक्टर असल्याने  त्यांच्याकडे सर्वच पक्षाचे रुग्ण येतात त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून त्यांनी संबंधित कात्रण काढून बाहेर फेकून दिली सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास याचा राग येऊन इरफान शेख उर्फ चिपडया, आला व त्याने डॉक्टरांना तुम्ही माझ्या बायकोशी वाईट वागणूक का दिली असा बनाव करत इरफान त्याचा भाऊ  इम्तियाच  शेख, फैसल प्यारे मोहम्मद, हिना इरफान शेख व त्यांच्या सोबत असलेल्या चार ते पाच जणांनी येऊन डॉक्टरांना लाथा  बुक्क्यांनी मारहाण करून क्लिनिकची     तोडफोड केली त्यामुळे त्यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असुन व पो नी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपो नि निखिल बोंडे अधिक तपास करीत आहेत

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने