शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या कारवाईत अवैद्य शस्त्र विरोधात मोहीम राबविण्यात येऊन तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने धडक कारवाई करत 5 लाख 32 हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावर नाशिक परिक्षेत्र आणि पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित धुळे जिल्हा यांनी अवैध शस्त्र व अवैध व्यवसाय या विरुद्ध विशेष मोहीम राबविण्याबाबत धुळे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलिस सतर्क असतानाच गोपनीय बातमीदार यांचेकडून सपोनि अभिषेक पाटील व पो. ना. चत्तरसिंग खसावद यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कार्यवाही करण्यासाठी एक पथक तयार करून सापळा रचला असता दिनांक 22 डिसेंबर रोजी पहाटे 3.30 वाजता सांगवी ते वरला रोडवर जोयंदा गावाजवळ शोध मोहीम राबवीत असताना पंजाब पासिंग असलेली एक संशयित कार वरला गावाकडून गावाच्या दिशेने समोर येत असल्याचे दिसून येताच सदर पथकाने प्रसंगावधान राखत पोलिस वाहन रस्त्यात आडवे लावून संशयित वाहनाचा अडवले असता सदर वाहनातून 3 इसम मिळून आले या तीनही इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्यात प्रत्येकाच्या अंगावर कमरेला प्रत्येकी 1असे तिने देशी बनावटीचे पिस्टल, प्रत्येक मॅगझीन मध्ये दोन जिवंत काढतूस, टच स्क्रीन मोबाईल रोख रक्कम व वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली.☺️ या कारवाईत आरोपी सुखविंदर सिंह प्रकाश सिंह शीख वय 21 राहणार बुलेरियन तालुका मलॉट जिल्हा मुकसर राज्य पंजाब, लवदीप सिंह दलजीत सिंह जाटा वय 23, रा कोटइशिखा तालुका धरमकोट जिल्हा मोगा राज्य पंजाब , दुर्जन सिंह बलविंदर जाट वय 30 वर्ष राहणार गुरु तेग बहादूर नगर तालुका जिल्हा फ्रीडकोट राज्य पंजाब अशी या आरोपींची नावे असून त्यांच्या बॅगमध्ये इतर 5 देशी बनावटीचे पिस्टल मॅगजिन मिळून आलेत. यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या शस्त्र परवाना नसल्यामुळे त्यांना अटक करून 2 लाख रुपये किमतीच्या आठ देशी बनावटीचे पिस्टल, 1200 किमतीचे सहा जिवंत काढतूस, 15 हजार रुपयांची रोख रक्कम, 16 हजार रुपये चे मोबाईल फोन आणि 3 लाख रुपये किंमतीची मारुती स्विफ्ट कार क्रमांक pb 23 af 4564 असा एकूण 5 लाख 32 हजार 200 रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत करून तिनही आरोपींच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 3/ 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करत आहेत.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित , अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सपोनि अभिषेक पाटील पो उप निरीक्षक नरेंद्र खैरनार ,पो कॉ राजू सोनवणे, संभाजी वडवी ,पो ना चरसिंग खासावद, कसा संजीव जाधव, पवन गवळी ,पो शिपाई इसरार फारुकी यांच्या पथकाने केली आहे.
Tags
news
