शिंदखेडा - वरील निर्यात बंदी हटवा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संगठनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री नारायण भटेसिंग गिरासे देगांव यांची खासदार डॉ श्री सुभाष बाबा भामरे यांच्या कडे मागणी
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष श्री नारायण भटेसिंग गिरासे देगांव व कांदा उत्पादक शेतकरी यांनी खासदार श्री सुभाष बाबा भामरे(मा संरक्षण मंत्री भारत सरकार ) यांना कांदा निर्यात बंदी हटवावी व विदेशी कांदा भारतात येणे बंद करावे या मागणी साठी निवेदन देण्यात आले गिरासे यांनी भामरे साहेबाना सांगितले की शेतकरी पहिल्या पासून कर्जाच बुडालेला आहे शेतकऱ्यांना दोन पैसे भेटणार होते तेव्हाच केंद्राने कांदा निर्यात बंदी केली व विदेशी कांदा आयात केला त्या मुळे शेतकरी वर्गाचे खूप मोठया प्रमाणात नुकसान होत आहे हि कांदा निर्यात बंदी लवकरात लवकर हटवावी हि नम्र विनंती व बाबा साहेबांनी सांगितले कि पुढच्या आठवड्यात निर्यात बंदी हटवीन्या बद्दल पर्यंत्न करतो आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय लवकरात लवकर देऊ
Tags
news
