किरकोळ किरकोळ वादातून झाली बालकाची हत्या , आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना यश



 शिरपूर प्रतिनिधी  - शिरपूर तालुक्यातील नव्या अंतुर्ली शिवारात एका शेतात सहा वर्षे बालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यात खडबड माजली होती.दिनांक 23 बुधवारी  रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. मोहित दिनेश इशी वय 6 अंतुरली ता. शिरपूर येथील दिनेश शिवाजी व ज्योती दिनेश  ईशी यांच्या मुलगा होता. मोहीत हा गावातील शेतात मजुरीसाठी गेलेल्या आईसोबत शेतात गेला होता, मोहित दुपारी खेळत असताना अचानक गायब झाल्याने आई ज्योती तिच्या लक्षात येतात त्याची शोधाशोध सुरू केली. मात्र तो मिळून आला नाही शोध घेत असताना उशिरा एका शेतात मृतावस्थेत तो आढळून आला होता .मोहित च्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले होते. घटनेची माहिती प्राप्त होतात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पोलीस टीम यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करून पंचनामा केला होता. घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फोरन्सिक पथक , सायबर क्राईम ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा इत्यादी विभागांचे अधिकारी हजर होऊन घटनेच्या शोध घेतला जात होता .त्यात एका 13 वर्षीय अल्पवयीन संशयित बालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता झाडावरून तोडण्यात आलेल्या बोरांच्या हिस्सा वाटप वरून वाद झाला, दोन बालकांमध्ये  हा  वाद-विवाद विकोपास गेला व रागाच्या भरात सदर बालकाने या अल्पवयीन सहा वर्षीय बालकाच्या दगडांनी ठेचून खून केल्याची कबुली दिली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांचे सहकारी यांनी युद्धपातळीवर तपासकाम सुरू केले व अवघ्या तीन ते चार तासात मारेकऱ्यांचा शोध घेतला आणि संशयित आरोपी बालक वय 13 यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.व मुलाच्या आई च्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने