शिरपूर येथे माजी पंतप्रधान वाजपेयींना आदरांजली




केंद्र सरकारची कृृृषी योजना शेतकरी हिताची : आ. काशिराम पावरा
भाजपा शेतकर्‍यांविषयी खोटी तळमळ दाखवत नाही : प्रदेश सदस्य बबनराव चौधरी

                         

शिरपूर : देशाच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व धुरंधर नेते, भारतरत्न माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंतीनिमित्त शिरपूर येथे भाजपा तर्फे आ. काशिराम पावरा, महाराष्ट्र भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन करुन आदरांजली वाहाण्यात आली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका सरचिटणीस जितेंद्र सुर्यवंशी, पिपल्स बॅन्क संचालक संजय चौधरी, नगरसेवक देवेंद्र राजपुत, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, जिल्हा चिटणीस जाकीर तेली, बुथ अध्यक्ष राजुलाल मारवाडी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, हिंगोणी अध्यक्ष जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. दि. 25 डिसेंबर रोजी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती निमित्त सुशासन दिवसाचे औचित्य साधून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 18, 000 कोटी रूपये जमा केलेत. पंतप्रधानांचे संबोधन ऐकण्यासाठी शिरपुर येथे प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या संपर्क कार्यालयात उपस्थित पदाधिकार्‍यांन समोर आ. काशिराम पावरा यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना या शेतकरी हित जपले जाईल हे दृष्टीसमोर ठेवूनच राबविल्या जात आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी विरोधी पक्षाकडुन चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविणे अथवा घाबरविणे या कृती निंदनीय आहेत केंद्र सरकारची कृषी योजना शेतकरी हिताची आहे असे त्यांनी सांगितले. तर भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांविषयी खोटी तळमळ दाखवत नाही तर खरोखरच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी योग्य पावले उचलत आहे. मागणी पुरवठ्याचे गणित, हमीभाव, करार, कंत्राटी शेती, शेती करार अशा अनेक बाबींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यात सुलभता आणून शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे होणारे नुकसान रोखले जावे हा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमुद केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने