धुळे जिल्हा प्रतिनिधी- राष्ट्रीय जनमंच(सेक्युलर) पक्ष धुळे जिल्हा अध्यक्ष पदावर नुकतीच हिरालाल गोविंद चौधरी यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे .मागील वर्षभरात राष्ट्रीय जनमंच(सेक्युलर) पक्ष विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून पक्ष संघटन तयार करण्यावर व सामान्य नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघर्ष सुरू केला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी पक्षवाढीसाठी विविध पदाच्या नियुक्त्या जाहीर करून पक्षाची ताकद निर्माण करत आहे. जनमंच पक्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील सक्रिय सहभाग घेऊन निवडणूक लढवण्याच्या निर्णय घेतला आहे .
या सर्व पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका सामान्य नागरिकांपर्यंत व शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी व शेतकऱ्यांसाठी आगामी काळात संघर्ष करून शेतकऱ्यांची सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्ष काम करणार असून यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातून धुळे जिल्हा अध्यक्ष म्हणून हिरालाल गोविंद चौधरी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे
चौधरी यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रीय जनमंच पक्षासाठी तळागाळातील लोकांना एकत्रित करून सामान्य लोकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी काम करून आपण पक्ष वाढीवर भर देणार आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष कैलास कोळसे ,प्रदेशाध्यक्ष अविनाश झेंडे, उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, प्रदेश महासचिव भगवानराव जहाड, प्रदेश कोषाध्यक्ष प्रकाश थोरात, सचिव संदीप लांडगे, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख इत्यादींनी अभिनंदन केले आहे.
पक्षाचे धुळे शहर अध्यक्ष रवींद्र थोरात जिल्हा संघटक रमेश चिकटे धुळे तालुका अध्यक्ष जगदीश नेरकर इत्यादींनी चौधरी यांचे अभिनंदन केले आहे.
Tags
news
