शेतकऱ्यांचे प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी सदैव शेतकाऱ्यांसोब ---- डॉ जितेंद्र ठाकूर




शेतकरी पुरस्कार 2020 चे वाटप वेळी डॉ जितेंद्र ठाकूर यांचे प्रतिपादन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. श्री शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील ८० शेतकऱ्यांना प्रगतिशील शेतकरी पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले.  सर्व शेतकऱ्यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. अर्थे येथील झेंडा चौकात झालेल्या या कार्यक्रमाला लोकप्रिय नेते मा. डॉ. जितेंद्रजी ठाकूर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी शिरपूर साखर कारखानासह विविध सहकार पुनर्जीवित करण्यासाठी शक्य त्या पद्धतीने लढा उभारण्याची ग्वाही दिली. आतापर्यंत तालुक्यात सर्वच शेतकरी प्रकल्प बंद करण्यात आले यामुळे शेतकरी आज हवालदिल झाला आहे. यासाठी अनेक आंदोलने करूनही शेतकरी संघटीत होत नसल्याने त्याचा उपयोग होत नसल्याचे डॉ जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. "केंद्रातून स्वतःचे मेडिकल कॉलेज मंजूर करून आणू शकणारे, कारखाना का चालू करू शकत नाही" हा प्रश्न त्यांनी उपस्थित करताच सर्वांनी विशेष दाद दिली.

तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्री. सुमितदादा पवार, जिल्हाध्यक्ष श्री. मयूरभाऊ बोरसे- पाटील, पदवीधरचे जिल्हाध्यक्ष श्री. बी. यस. पाटील, शिरपूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष श्री. रमेशआबा करंकाळ, पंचायत समिती सदस्य श्री. रामकृष्ण महाजन, श्री शिरिष पाटील, श्री योगेश सनेर, ब्रिजलाल मोरे,धनराज मोरे, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते. 
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. आशिषकुमार अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.  शेतकरी प्रतिनिधी म्हणून श्री. कुंदन पाटील  यांनी निसर्गाच्या मनलहरीपणामुळे शेतकऱ्यांना कशाप्रकारे नुकसान सहन करावे लागते, आणि त्यासाठी उसासारख्या शाश्वत पिकाची असलेली गरज अधोरेखित केली. श्री. मिलिंद पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतांना तालुक्यातील डबघाईला गेलेले सहकार क्षेत्र पुनर्जीवित करण्याची कशी आवश्यकता आहे व त्यासाठी पुढील दिशा स्पष्ट केली. तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि प्रगतिशील शेतकरी श्री. हेमंतभाऊ सनेर यांनी यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेऊन एकत्र येण्याचे आवाहन केले. संपूर्ण धुळे जिल्ह्यातील असा पहिलाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रम डॉ. राहुल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. सूत्रसंचालन श्री. प्रदीप गोपाळ यांनी केले तर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष श्री.धीरज सोनवणे यांनी आभार मानले. युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. प्रशांत वाघ-पाटील, गण नेते सुधीर चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण, सरचिटणीस श्री. बाळासाहेब पाटील, श्री. मुन्ना पाटील, तालुका संघटक प्रफुल्ल पाटील, पदवीधर चे तालुकाध्यक्ष श्री. दिनेश पाटील, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम पाटील,जिल्हा संघटक गौरव भैरव 
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्याध्यक्ष अक्षय पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस दिपक पाटील शहराध्यक्ष भुपेश पाटील, गौतम थोरात, हरीश पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रमोद चव्हाण, दिनेश पाटील, विनोद चव्हाण, वाजीद शेख, परेश पाटील, अनिल कोळी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने