कृष्णा कोळी शहादा तालुका प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे मास्क न वापरल्याने विद्यार्थ्यास पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली असून ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे म्हणून विद्यार्थ्यास कानाचे पडदे फाटेपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गावकरी व विविध संघटना मार्फत आमरण उपोषण कारण्यातयेत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की महिनाभरापूर्वी प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्या विरोधात मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान एका विद्यार्थ्याने मास्क न वापरल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाई करत बेदम मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली.मोहिदा येथून घाईघाईने लोणखेडा येथे परीक्षेला निघालेल्या शाळेकरी विद्यार्थ्याने मास्क न वापरल्याने बेदम मारहाण करून पोलिस ठाण्यात डांबून ठेवले होते. त्यानंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्यास दवाखान्यात भरती करून जवळपास पंधरा दिवस उपचार केल्यानंतर देखील होणाऱ्या त्रासामुळे त्याची मानसिक स्थिती ढासळली आहे . तसेच माणुसकीचे दर्शन दाखविणारे पोलिस कर्मचारी देखील आपण पाहिले आहेत.परंतु शहादा शहरातील ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून अन्यायकारक असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता सरळ कानशिलात भडकावली असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. पोलिसांकडून आपल्या पदाचा अधिकाराचा गैरवापर होत नाही ना ?असा प्रश्न निर्माण होतोय.या घटनेस जबाबदार पोलीस कर्मचार्यांविरोधात अनेक वेळेस तक्रार व निवेदन देऊन देखील पोलीस प्रशासन या प्रकरणाची दखल घेतली नाही म्हणून पीडित शाळेकरी विद्यार्थ्यांस जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील.
Tags
news
