शिरपूर येथील मांडळ शिवारात एका कालीपिली वाहनाने धडक दिल्यामुळे तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनला वसीम सिराज खाटीक वय 26, व्यवसाय चिकन दुकान राहणार सुंदरवाडी मांडळ रोड शिरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी यांच्या भाच्या यास दिनांक 13 डिसेंबर रोजी त्यांच्या घरासमोरील अंगणात मांडळ गावाकडून शिरपूर शहराकडे भरधाव वेगाने येणारे कालीपिली वाहन क्रमांक एम .एच. 19 - वाय- 0178 या वाहनाने भरधाव वेगाने येऊन व वाहनावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण न ठेवता बेजबाबदारपणे वाहन चालवल्याने फिर्यादी यांच्या भाचा अमन कुरेशी वय 19 यास धडक बसल्याने त्यास गंभीर दुखापत झाली त्यास वैद्यकीय उपचारासाठी धुळे येथे नेण्यात आले होते उपचारादरम्यान त्याच्या डोक्यात मार लागल्याचे निष्पन्न झाले म्हणून फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे सदरच्या तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Tags
news
