जिल्हा संपर्क प्रमुख पदी जिवनसिंग राजपूत यांची निवड



मलकापूर - श्री करणी सेनेचे युवा उपाध्यक्ष जिवनसिंग मानसिंग राजपूत यांची राष्ट्रीय बजरंग दल बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख पदि निवड करण्यात आली. हि निवड आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल आंतराष्ट्रीय अध्यक्ष. प्रविणभाई तोगडीया यांच्या आदेशाने तसेच अहिप चे विदर्भ महामंत्री किशोर दिकोडंवार. विदर्भ अध्यक्ष अनुपमजी जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बजरंग दल संपर्क प्रमुख पदि जिवनसिंग मानसिंग राजपुत यांची नियुक्ती करण्यात आली.
जीवनसिंग राजपूत यांच्या समाज कार्या ची दखल घेऊन सदरची स्तुत्य निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या निवड बद्दल त्यांचे सर्वच सामाजिक स्तरातून स्वागत होत असून अभिनंदन होते आहे. राजपूत यांच्या निवड झाल्याबद्दल समस्त राजपूत समाज व करणी सेनेच्या सर्व संघटना यांच्या वतीने अभिनंदन केले आहे व त्यांच्या भावी समाज कार्यास शुभेच्छा दिल्या जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने