महाराष्ट्रातील 5000 शेतकरी चे दिल्लीच्या आंदोलनास पाठींबा शिरपुरात शेतकरी रॅली चे स्वागत व सभा




शिरपूर प्रतिनिधी- केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या 22 दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनादरम्यान 20 ते 22 शेतकऱ्यांच्या कडाक्याच्या थंडीमध्ये मृत्यूदेखील झाला आहे. तरीदेखील केंद्रातील मोदी सरकारने या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाहीत .म्हणून महाराष्ट्रातून तब्बल पाच हजार शेतकरी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक येथून धुळे मार्गाने  दिनांक 22 डिसेंबर रोजी सायंकाळी  शिरपूर शहरात आगमन होत असल्याने या शेतकरी रॅलीचे भव्य स्वागत करण्याच्या निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. 
सदरची रॅली रामदेव बाबा मंदिर आमोदा येथे येत आहे येथून पायी मेन रोड ने चालत पाच कंदील चौकात सायंकाळी 6 ते 9 या वेळेत जाहीर सभा होणार आहे.
केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कायद्यामुळे भविष्यात शेती व्यवसाय धोक्यात येणार आहे ,शेतकरी ,शेतमजूर ,कष्टकरी गोरगरिबांवर छोट्या व्यापाऱ्यांनाही या कायद्याची जरब बसणार असून भांडवलदारांचे या कायद्यामुळे भले होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी व दिल्लीकडे निघालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या त्याला प्रोत्साहन देण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.
या जाहीर सभेस माजी आमदार जे पी गावित, किसान सभेचे किसन गुजर ,डॉक्टर अजित नवले ,कॉम्रेड राजू देसले व कामगार नेते संबोधित करणार आहेत या रॅलीचे स्वागत जाहीर सभा व मुक्काम यासाठी शिरपूर येथील किसान संघर्ष समन्वय समिती शिरपूर तालुक्याच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे याबाबतची बैठक दिनांक 18 रोजी काँग्रेस भवन शिरपूर येथे संपन्न झाले सदर रॅली ला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून शिरपूर तालुक्याच्या वतीने येणाऱ्या येथील शेतकऱ्यांना रात्रीचे भोजन व निवास व्यवस्था करण्याचीदेखील नियोजन करण्यात आले आहे सदरील बैठकीत शिरपूर तालुका काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अभिमान भोई ,तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, शहराध्यक्ष उत्तमराव माळी ,शेतकरी विकास फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश करनकाळ, डॉ.मनोज महाजन ,डॉ. जितेंद्र ठाकूर ,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख भरत सिंह राजपूत ,शहर प्रमुख मनोज धनगर ,शिवसेना संघटक प्रेम कुमार चौधरी ,भाकपचे तालुका सेक्रेटरी एड. संतोष पाटील एड. मदन परदेशी एड. सचिन थोरात, किसान सभा जिल्हाध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी ,तालुका अध्यक्ष किशोर सूर्यवंशी ,अर्जुन कोळी, जितेंद्र देवरे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष ईश्वर बोरसे, स्वप्नील जाधव ,जिल्हा सचिव मनोज राजपूत, सत्यशोधक जनआंदोलनाचे कचरू अहिरे, दत्तू थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते तरी तालुक्याच्या जनतेने आपले सहकारी मित्र यांच्यासह या जत्याच्या स्वागत करण्यासाठी उपस्थित रहावे व नियमांचे पालन करत यात सहभागी व्हावे असे आवाहन तालुका किसान संघर्ष समन्वय समिती तर्फे करण्यात आले आहे


 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने