चाळीसगाव कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्यांची मनमानी, तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची होतेय अवहेलना




चाळीसगाव - देशाच्या अन्नदाता म्हणून ज्या शेतकऱ्यांची देशभरात ओळख आहे त्याचे शेतकऱ्यांची थेट कृषी कार्यालयात कृषी अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे अवहेलना होत असल्याची तक्रार समोर आली आहे चाळीसगाव तालुका कृषी अधिकारी साठे हे शेतकऱ्याची अत्यंत उद्धटपणे वागतात खेड्यापाड्यातून आलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कुठली माहिती विचारण्यात आले असता त्यांना योजनांबद्दल माहिती दिली जात नाही. कृषी अधिकारी  शेतकऱ्याला अथवा तक्रार यांना आपल्या केबिनला येऊ देत नाही.  शेतकरी दिवसभर कार्यालय बाहेर बसतो मात्र  तरी देखील त्यांच्या समस्यांचे समाधान होत नाही. त्यामुळे कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची अवहेलना होत असल्याचे प्रकार समोर येत आहे 
कोरोना काळात शेती करणे अवघड झाले, शेतकऱ्यांना प अवकाळी पावसाने झोडपले आहे त्यामुळे निसर्गाच्या कहर सुरू असतानाच कृषी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बेजबाबदारपणे वागण्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे एक तर अधिकारी नियमित कार्यालयात उपस्थित राहत नाही कुठे गेले असे विचारले असता नेहमी फिल्डवर आहेत असे उत्तर दिले जाते आठवड्यातून दोन ते तीन दिवस देखील अधिकारी कार्यालयात येऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत त्यामुळे आता कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन या कार्यालयाच्या कारभाराच्या समाचार घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे .
राज्य कोरोनाच्या संकटात असताना देखील तालुका कृषी कार्यालय यांना शेतकऱ्यांसाठी  काम करता आले नाही, योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ,अथवा माहिती विचारले असता योजना बंद झाल्या असे सांगितले जाते .या सर्व कारभार यापासून त्रस्त झाल्यामुळे पिंपरी येथील शेतकरी मधुकर रामभाऊ निकम यांनी थेट कृषी मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या असा आरोप आहे मला  शेतकरी असल्याचा दाखला मागणी साठी पाच दिवस फिरून देखील तो देण्यात आला नाही. याचे कारण असे की संबंधित कृषी अधिकारी हे कार्यालयात हजर झालेच नाहीत त्यामुळे ते नेमक्या कोणत्या फिल्डवर असतात हा संशोधनाचा भाग आहे .
मात्र यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून त्यांना कोणतेही कृषी विषयक मार्गदर्शन मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हताश होतात आणि आत्महत्या कडे मार्गस्थ होतात. त्यामुळे अशा बेशिस्त अधिकारी आणि कर्मचारी यांची कृषी खात्याने विशेष दखल घेऊन यांनी राबवलेल्या योजनांची चौकशी करावी व अश्या अधिकारी यांना निलंबित करावे अशी विनंती व मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने