वरूळ येथे एच. आर. पटेल कन्या माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात रासेयो तर्फे महापरिनिर्वाण दिन साजरा



शिरपूर : तालुक्यातील वरूळ येथील एच. आर. पटेल  माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे होते.
प्राचार्य पी.आर साळुंखे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. तसेच एन. एस. ढिवरे यांनी बाबासाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या प्रसंगी रासेयो विभाग प्रमुख आर.आर. रघुवंशी, श्रीमती एम. आर. पाटकर, डी. ए. जाधव, एस. जे. पाटील, एस. के. पाटील, एम. एस. पाटील, एस. सी. शिंपी, ए. बी. महाजन, डी. एन. माळी, बी. एस. बडगुजर, पी. टी. पवार, बी. एस. पारधी, एल. बी. ठाकरे, पी. बी. जैन, बापू भिल उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने