शिरपूर येथील केव्हीपी संस्थेचे माजी मुख्याध्यापक प्रा.गुलाबगिरी एस. गोसावी यांचे सुपुत्र चेतनगिरी गोसावी यांना नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या तर्फे वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात पीएचडी पदवी जाहीर करण्यात आली. डॉ.चेतनगिरी गोसावी यांनी "एम्पिरिकल स्टडी ओन प्रोग्राम रन्स अंडर एग्रीकल्चर टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट एजन्सी (आत्मा) अॅण्ड इम्पॅक्ट ओन फार्मर्स" या विषयावर शोधप्रबंध सादर केला व ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षकांन पुढे सादरीकरण केले.
त्यांना केव्हीपी संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दिनेश भक्कड यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.चेतनगिरी गोसावी यांनी बीएससी एग्रीकल्चर मध्ये केले आहे, तसेच मार्केटिंग मध्ये एमबीए पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या पीएचडी संशोधन प्रकल्पातून शेतकर्यांना फायदा होईल व नवीन तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीकरता येणार आहे.
डॉ.चेतनगिरी गोसावी यांच्या यशाबद्दल केव्हीपी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, सचिव नानासाहेब निशांत रंधे, खजिनदार मा.आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, सर्व विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल, उपप्राचार्य प्रा.डी.बी.पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.व्ही.पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहे.
Tags
news
