तालुक्यतील पिंप्री येथे शेतकरीना मार्गदर्शन, लुपिन फाउंडेशन तसेच "कापुस आदर्श शेतकरी एकता गटाचा उपक्रम




शिरपूर - पिंप्री ता. शिरपुर येथे जागतिक मृदा दिवसानिमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन व लुपिन फाउंडेशन तसेच "कापुस आदर्श शेतकरी एकता गटाच्या वतीने"  किटकनाशके व फवारणीचे ईतर साहित्याची विल्हेवाट व व्यवस्थापन करण्यात आले. तसेच कृषी विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आर. डी. माेरे, कृषी सहाय्यक शिवराज माळी, लुपिन फाउंडेशन चे व्यवस्थापक गाैरव पाटील, पं. स. सदस्य विजय खैरनार, कृषी मित्र आनंद सावळे, दिनेश उंकारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. व किटकनाशकच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यासाठी कचरा पेटी ठेवण्यात आल्या सर्व शेतकरी बांधव यांनी रिकाम्या बाटल्या पेटीत टाकल्या यावेळी पिंप्रीचे सरपंच प्रविण राजपूत, माजी सरपंच वासुदेव गिरासे, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गिरासे, माजी सरपंच संजय धनगर, मनाेज राजपूत, राकेश राजपूत आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने