महापरिनिर्वाण दिनि भव्य रक्तदान शिबीर व अभिवादन कार्यक्रम , 171 युवकांनी केले रक्तदान जयभीम बहुउद्देशीय स्पोर्टिंग अँड प्रतिष्ठान व गणेश सावळे मित्र मंडळाचा उपक्रम




 शिरपूर - भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक०६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता. नगरसेवक आयु. गणेश भाऊ सावळे यांच्यावतीने  रक्तदान शिबीर  व अभीवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते... या प्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार काशिराम दादा पावरा यांच्या हस्ते करण्यात आले व सामुहिक बुद्ध त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले,पि.एस.आय.निलेश सोनवणे, पी.एस.आय. किरण बहारे, पि.एस.आय मुरकटे साहेब, नगरसेवक गणेश भाऊ सावळे, नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट , नगरसेवक हर्षल भाऊ राजपूत, प्रवीण पाटील सरपंच विखरण, अण्णासाहेब केशव सावळे, प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे, प्राचार्य सिद्धार्थ पवार, एडवोकेट युवराज ठोंबरे, विजय बागले, सुनील बैसाणे, डॉक्टर श्याम दशरथ पाटील आशिष अहिरे या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पअर्पण करण्यात आले, सदर कार्यक्रमात बोलताना आमदार काशीराम दादा पावरा यांनी गणेश भाऊ सावळे यांचे कौतुक केले महामारी च्या काळामध्ये रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मी आज आमदार आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी 171 व्यक्तींनी रक्तदान केले, रक्तदात्यांना प्रमाणपत्र व टी-शर्ट भेट म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.  मुकेश भाई पटेल ब्लड बँड शिरपूर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सिद्धार्थ पवार सर यांनी केले तसेच सुनील बैसाणे यांनी आभार मानले. सदर कार्यक्रमास सुभाष भोई, विकी ढिवरे, दिनेश भाऊ सावळे, रमेश भाऊ वानखेडे, पुरुषोत्तम पाटील, किरण कढरे, आनंदा खैरनार, रोहिदास थोरात, भटू थोरात, रमेश कढरे, गौतम थोरात, लखन भाऊ भिल, शौकीन कुवर, मायकल ठाकरे, मोनू शिरसाट, राजेश सावळे,कपिल मोरे, महिरराव सर, महेंद्र शिरसाट, मच्छिंद्र थोरात, खंडू महिरे, युवराज पारवा, अविनाश बैसाने,, आदि उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने