माजी मुख्याध्यापिका विनयभंग प्राचार्य धीरज बाविस्कर यांना अटक यांना शिर्डीत अटक






शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर येथील चोपडा फाट्यावर एस आर बी इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन प्राचार्य डॉक्टर धीरज तुकाराम बाविस्कर यांना शिर्डी पोलिसांनी 4 डिसेंबरला अटक केली आहे .या स्कूलच्या माजी महिला मुख्याध्यापिकेच्या विनयभंग करणे, तिच्याकडून लोन साठी घेतलेला चेकच्या दुरुपयोग करणे आदी कारणांवरून त्यांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. संबंधित 46 वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून त्या कार्यरत होत्या ऑगस्ट 2019 ते 2020 या कालावधीत शिर्डी परिसरातील राहते सर व एस आर बी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विनयभंग केला आहे. तिच्या पाठलाग करून आलिंगन देत नियमांचा भंग केला त्यावेळी मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता  मोबाईल हँडसेट फेकून फोडून नुकसान केले तिचे लैंगिक छळ केला  व प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला शिवीगाळ करून मारहाण केली व धमकावले असे फिर्यादीत नमूद केले आहे .सदर  महिलेची चेकद्वारे फसवणूक झाल्याची देखील फिर्यादीत नमूद आहे संशयित डॉक्टर धीरज बाविस्कर यांनी पीडित महिला यांच्याकडे नोकरीस असताना तिला कर्ज हवा असल्याकारणाने बँक ऑफ बडोदा च्या कोरा घेतला होता तो स्वतः जवळ ठेवून घेतला त्यावर व 2 लाख 84 हजार 200 रुपये टाकून बॅंकेत सादर करून तिची फसवणूक केली आहे शिवाय या महाशयांनी दुसऱ्या शिक्षकांसोबत देखील गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात डॉक्टर बाविस्कर यांच्याविरोधात भादवि कलम 354, 323, 504, 506 ,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे तालुक्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने