शहादा तालुक्यातील शहादा-खेतीया रस्त्यावरील सुलतानपुर फाट्यानजीक रस्त्याचा कडेला उभे असलेल्या. कापसाच्या ट्रोली ला कार ने धडक दिल्याने दोन जण ठार तर ५ जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.४ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
शहादा तालुक्यातील रायखेड येथील शहादा येथून आपल्या रायखेड येथे घरी येत असताना सुलतानपुर फाट्यानजीक कापसाने भरून ट्रॉली पंचर होऊन रस्त्याचा कडेला उभी होती. अचानक कार ने उभ्या ट्रॉली ला धडक दिली. अपघातात विद्या शिंदे (२७) अरु शिंदे(वय ३) हे ठार झाले तर कार मधील सुरेश खंडू शिंदे (वय६०),सरोजबाई शिंदे(वय ५४),हर्षल सुरेश शिंदे (३२),मयूर शिंदे (वय ३४) , यज्ञेश प्रथमेश हरदास ( वय ७) सर्व राहणार रायखेड हे गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ नागरिकांनी शहादा खाजगी दवाखान्यात रवाना करण्यात आले.घटनास्थळी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस काँ. बिरारे, जितू पाडवी आदी कर्मचाऱ्यांनी येऊन रस्त्यावरील वाहन सुरळीत केली.
Tags
news
