पेट्रोल ,डिझेल ,घरघुती गॅस महागाईच्या विरोधात शिव सेनेचे निषेध आंदोलन




शिरपूर - शिवसेना शिरपूरच्या वतीने पेट्रोल ,डिझेल ,घरघुती गॅस महागाईच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. दि.१२/१२/२०२० रोजी पेट्रोल, डिझेल, घरघुती गॅस सिलेंडर महागाई विरोधात केंद्र  शासनाचा जाहीर निषेध व शेतकरी आंदोलन विरोधात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांच्या भावना दुखावल्या मुळे निषेधार्थ शिवसेना धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख मा.श्री बबनराव थोरातसाहेब यांच्या  आदेशाने व धुळे सहसंपर्क प्रमुख-इंजि.अतुलभाऊ सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख-इंजि.हेमंत साळुंखे , यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर निषेध आंदोलन विजय स्तंभ (पाच कंदिल) चौकपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालय शिरपूर (प्रांतकार्यालय) पर्यंत  लोट गाडीवर आंदोलन केले. त्यावेळी उपस्थितीत  श्री.भरतसिंग राजपूत(उपजिल्हा प्रमुख), श्री.विभाभाई जोगराणा (उपजिल्हा संघटक)श्री.रजेसिंग राजपूत,(एसटी का.सेनेचे जिल्हाअध्यक्ष),इंजि.अत्तरसिंग पावरा(तालुका प्रमुख),श्री.दिपक चोरमले( तालुका प्रमुख),मंगलसिंग भोई(उपतालुका प्रमुख), श्री.मनोज धनगर (शहर प्रमुख),प्रेमकुमार चौधरी(शहर संघटक),बंटी लांडगे,योगेश ठाकरे,विकास महिरराव,(उपशहर प्रमुख),देवाजी पाटील,अमोल पाटील ,गोलू मराठे,दिनेश गुरव,नितीन सोनार,बळीराम बंजारा,योगेश शिंपी,संजय देवरे ,पिंटू शिंदे,जितेंद्र पाटील,इंद्रिस शहा,शाकिर कुरेशी,सागर निगवाडे, दिपक धनगर,बाप्पू पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने