लोक नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिरपूरला विविध कार्यक्रम संपन्न




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर आज दिनांक 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष लोक नेते माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात  यात 12 इम्युनिटी क्लीनिक चा प्रारंभ या वेळो करण्यात आला, महिला स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा या वेळी संपन्न झाला ज्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता. या प्रसंगी जाणता राजा क्रिकेट करंडक स्पर्धा  चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धे साठी  मोठे बक्षीस ठेवण्यात आले आहेत या स्पर्धेची सुरवात आज करण्यात आली.कामगारांना ब्लँकेट वाटप, शहरातील 20 शाखांचे फलक अनावरण तसेच मोफत होमिओपॅथीक रोगनिदान व उपचार शिबीर अशा विविध कार्यक्रम आज मान्यवराच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहेत. शिरपूर निमझरी रस्त्यावरील होमियोपेथिक महाविद्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे ,प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, य सत्यवती पावरा,काणीलाल पावरा, डॉ उत्तमराव महाजन, डॉ जितेंद्र ठाकूर, डॉ मनोज महाजन, सौ. अमृता महाजन, रमेश करंकाळ, सुरेश पाटील, युवराज पाटील ,प्रियंका पाटील ,शिरीष पाटील, युवराज राजपूत, हेमराज राजपूत, लीलाचंद लोणारी,उदयन राजे पाटील,रामकृष्ण पाटील, सौ सुलोचना साळुंखे, शि सा का चे माजी अध्यक्ष वसंतराव पाटील, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे , कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज पाटील  इ मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी माजी आमदार अनिल अण्णां गोटे, डॉ उत्तमराव महाजन,सौ अमृता महाजन आणि अर्जुन टिळे यांनी मार्गदर्शन केले. 
याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या जीवन पटावर प्रकाश झोत टाकला महाराष्ट्र साठी आपल्याला या महान नेत्यांचे नेतृत्व लाभले त्याबद्दल आपण धन्य आहोत असे उद्गार काढले .शरद पवार साहेबांची राजकीय उंची कोणीही मोजू शकत नाही आणि पवार साहेब काय करतील हे कोणीही सांगू शकत नाही अशा प्रकारचे जादुई सर्वमान्य आणि लोकमान्य नेतृत्व म्हणजे पवार साहेब आहेत असेदेखील गौरवोद्गार याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. आणि म्हणून या नेत्याच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभकामना देण्यासाठी आपण हा सोहळा आयोजित केला त्याबद्दल आभार व्यक्त केले भविष्यात शिरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून  प्रचार-प्रसार व जनसामान्यांचे कामे करून पक्षवाढीसाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे असा देखील संदेश कार्यकर्त्यांना यावेळेस देण्यात आला.
सूत्र संचालन व आभार प्रदर्शन हेमराज राजपूत यांनी केले  या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज महाजन व त्यांचे होमिओपॅथिक महाविद्यालयातील सर्व डॉक्टर्स कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने