पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड सह तिन पोलीसांवर गुन्हा दोंडाईचा खून प्रकरणात पोलसांवरच झाला गुन्हा दाखल, पो. नि. पंजाबराव राठोड फरार





दोंडाईचा प्रतिनिधी: - दोंडाईचा येथील मोहन मराठे मृत्यू प्रकरणी दोंडाईचा पोलीस स्टेशनचे तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड सह तिन पोलीसांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून सा.पोलीस निरीक्षक राठोड हे फरार असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोंडाईचा येथील मुकेश ऑईल मिल व कैलास ट्रेडर्सच्या गोदाम येथून 96 तांदुळाचे कट्टे चोरीला गेल्याची तक्रार नगरसेवक गिरधारीलाल रुपचंदाणी यांनी दिली होती.या फिर्यादीवरून पोलिसांनी दि 7 ऑक्टोबर रोजी संशयित म्हणून दोंडाईचा येथील मोहन मराठेसह तिन जणांना ताब्यात घेतले होते.त्याच दिवशी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास दोंडाईचा रामी रस्त्यावर मोहन मराठेचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोहन मराठेचा अचानक अशा प्रकारे मृतदेह मिळून आल्याने या बाबत सर्वत्र संशय व्यक्त करण्यात येत होता.याबाबत पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी तात्काळ याबाबतचा तपास सीआयडीकडे सोपवला व सीआयडीचे पोलीस अधिकारी रवीकिरण दरवडे यांनी गांभीर्याने शिताफीने तपासाची चक्र फिरवत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे सा.पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड,पोलीस कर्मचारी वासुदेव जगदाळे,सीताराम निकम,राहुल सोनवणे यांच्या विरुध्द मोहन मराठे च्या मृत्यूस जबाबदार,पुराव नष्ट करण्यासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात राठोड फरार असून तिन्ही कर्मचारींना सिआयडीने ताब्यात घेतले आहे.मोहन मराठे पोलीसांच्या ताब्यात असणे,त्यांच्या ताब्यातील मोहन मराठेचा मृतदेह त्याच दिवशी रस्त्यावर आढळुन येणे या अनेक घटना या संशयास्पद असल्याबाबत बोलले जात होते.सीआयडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवीकिरण दरवडे यांनी तपासाचे सुत्र फिरवल्यानंतर चारही जणांवर गुन्हा दाखल करत तिन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर सा.पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड फरार आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने