शिरपूर - राजपूत समाजाच्या कन्या अर्थातच मुलीं ह्या शिक्षण,वैद्यकीय,इंजिनियरिंग,विज्ञान,प्रशासन,पोलीस विभाग,राजकारण,समाजकारण आदी क्षेत्रात सातत्याने आघाडी घेत आहेत. विशेष म्हणजे राजपूत समाजाच्या वैभवात आणखी एक मानाचा शिरपेच उल्हासनगर येथील कु.गजनंगिरी उर्फ गौरी देवेंद्रसिंग गिरासे हिने खोवला आहे.गौरी ही श्री.नवलसिंग ठाणसिंग गिरासे यांची नात असून, तिचे वडील देवेंद्रसिंग नवलसिंग गिरासे यांचं उल्हासनगर येथे मेडिकल स्टोअर्स आहे.सदर गिरासे परिवार मुळचे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील पिंप्री येथील रहिवासी आहेत.कु.गजनंगिरी उर्फ गौरी हिने कलकत्ता येथे आयोजिलेल्या मिस इंडिया या स्पर्धेत महाराष्ट्राची स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.त्यात तिने विविध राज्यातील स्पर्धकांवर मात करून मिस इंडियाचा किताब पटकविला आहे.त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.एकनाथ शिंदे अन् कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी कु.गौरी गिरासेचे मनपूर्वक अभिनंदन केलं असून, तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शिरपूर तालुक्यातील या कन्या चे समस्त राजपूत समाजा कडून व विविध राजकीय सामाजिक स्तरातून अभिनंदन होत आहे. शिरपूर तालुका करणी सेना व निर्भीड विचार न्युज परिवारा कडून कु.गौरी गिरासेचे मनपूर्वक अभिनंदन .
Tags
news


Proud of Shirpur block it's really our block daughter bright future and also our Shirpur name knows now on international level.
उत्तर द्याहटवा