कृष्णा कोळी प्रतिनिधी**शहादा=
असलोद गावातील महिलांचा संसार उध्वस्त होण्यापासून वाचवायचा असेल,,,,तरुणाई व्यसनमुक्त करायची असेल तर दारूविक्री बरोबरच अवैध धंदे बंद करावीत,असे साकडे ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते राजू वानखेडे यांनी शहादा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहेत.
आयपीएस पर्यवीक्षाधिन अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात वानखेडे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेला लागुन असलेल्या असलोद गावात हाॅटेल व्यवसायाच्या नावाखाली देशी, विदेशी दारु,जुगाराचे अड्डे बिनधास्तपणे सुरू आहेत.त्यामुळे व्यसनापायी अनेक महिलांचा संसार उधवस्त झाले आहेत आणी आजही होत आहेत.तरुण मुले देखील व्यसनाधीन होण्याच्या मार्गावर असल्याने तो एक सामाजिक प्रश्न बनला आहे.कोरोनो महामारिच्या काळात देखील असलोद गावात ढाब्याच्या नावाखाली देशी-विदेशी दारुची विक्री होत गेली.दारु पिण्यासाठी परिसरातील गावाचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात.त्यामुळे ढाब्याना जणु यात्रेचे स्वरुप येते.परीणामी सामाजिक आंतराचे नियम पाळले गेले नाहीत. त्यामुळे असलोद गावात कोरोनाचा प्रादृभाव वाढला. असलोद औट पोस्टच्या काही अंतरावरील ढाब्यावर एक मुजोर व्यक्तीच्या पाठबळावर बिनधास्त बेकायदेशीर दारु विक्री सुरू आहे.हा मुजोर व्यक्ती कोणालाही न घाबरता गावातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणत आहे.याच व्यक्तीने सुरू केलेला जुगाराचा मोठा अड्डा नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस पथकाने उध्दवस्त करुन असलोद गावातील ग्रामस्थांना दिलासा दिला. अजुनही ढाब्यावर देशी-विदेशी दारुची विक्री होत आहे. राज्य उत्पादन विभागाच्या पथकाने थातुरमातुर कार्यवाही केल्याने ढाबे चालकाचे फावत आहे.वास्तवीक असलोद ग्रामपंचायतीने गावात दारुबंदीचा ठराव केला आहे. त्यामुळे दारु विक्रीला बंदी असणे आवश्यक आहे.पंरतु त्याचीही पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीने दि.०३/११/२०२० रोजी असलोद गावात बियर शाॅपी,वाईन शाॅपसाठी,ईतर देशी दारू विक्रीसाठी कोणालाही ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला दिलेला नाही, असा लेखी खुलासा ग्रामसेवकाने केला आहे. असे असतांना असलोद गावात बियर-शॉपिचा परवाना मिळालाच कसा ,याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. या सर्व गोष्ठीचा गांभीर्याने विचार करुन असलोद गावातील दारुबंदीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याबरोबरच गावातील बेकायदेशीर धंदे बंद करण्यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे,
Tags
news
