डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आवाहन

 



नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.2: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर 2020 रोजीचा महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम कोविडच्या पार्श्वभूमीवर पुर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

कोविड विषाणुच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी दादर येथे येण्यावर तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकांवरही गर्दी करण्यास निर्बंध आहेत.  शासनातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायांनी चैत्यभूमी दादर येथे न जाता घरातूनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे.

महापरिनिर्वाण दिन हा दिवस भारतीयांसाठी दु:खाचा, गांभिर्याने पालन करावयाचा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.  त्यामुळे कोविड संसर्गचा विचार करता महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धैर्याने वागावे.  तसेच घरी राहूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने