धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरिशभाई पटेल यांच्या दणदणीत विजय




 शिरपूर प्रतिनिधी -  धुळे नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणुकीचे निवडणूक नुकतीच पार पाडण्यात आली दिनांक 1 डिसेंबर रोजी या निवडणुकीचे मतदान झाले व आज दिनांक 3 डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिरपूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमरिशभाई रसिकलाल पटेल हे दणदणीत विजयी झाले आहेत .या निवडणुकीत एकूण 438 मतदार होते त्यातून 332 मध्ये प्राप्त झाली असून काँग्रेसचे उमेदवार अभिजीत मोतीलाल पाटील यांना 98 मध्ये प्राप्त झालेले आहेत व 4  मते ही बाद झाली आहेत .त्यामुळे या निवडणुकीत अमरिशभाई पटेल यांच्या दणदणीत विजय झाला आहे .विधानसभा निवडणुकांच्या आधी पक्ष बदलाच्या भूमिकेमुळे अमरिशभाई पटेल यांनी आपल्या विधान परिषद पदाचा राजीनामा दिला होता आणि ही जागा रिक्त झाली होती पुन्हा या जागेसाठी भाजपकडून निवडणूक लढवत यांनी आपले स्थान निश्चित केले असून आपला विजय प्राप्त केला आहे व पुन्हा एकदा धुळे-नंदुरबार जिल्ह्यात अमरिशभाई पटेल यांचे नेतृत्व पुढे आले आहे. या विजयानंतर समर्थकांनी चांगलाच मोठा जल्लोष केला असून आनंदोत्सव साजरा केला आहे आणि या विजयाबद्दल राजकीय आणि सामाजिक स्तरातून अमरिशभाई पटेल यांचे अभिनंदन होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने