भा क प किसान संघर्ष समिती व किसान सभा यांचे विविध मागण्यांसाठी उपविभागीय कार्यलयावर आंदोलन





   

शिरपूर - केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता त्या त्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र राज्य किसान सभा धुळे जिल्हा यांच्या वतीने शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या केंद्र सरकारने केलेले शेतीविषयक कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याने ते रद्द करण्यात यावे व दिल्ली येथे शेतकरी आंदोलन वरील दडपशाही बंद करावी या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना सादर करण्यात आले आहे .यात प्रामुख्याने शेतमाल विक्री कायदा रद्द करावा, कंत्राटी शेती कायदा  रद्द करावा, अत्यावश्यक वस्तू सेवा कायदा रद्द करावा, कोरोना काळातील वीज बिल रद्द करावे,  अतिवृष्टीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, तालुक्यातील सूतगिरणी मध्ये शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी करावा व शेअर्स धारकांची रक्कम परत करावी, शिरपूर तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या वाटणीचे प्रकरण मंजूर करण्यात यावेत वीज वितरण कंपनी मार्फत वितरित होणारे ट्रांसफार्मर शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे ,प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील करपात्र वसुली मागे घेण्यात यावी, नागरिकांची कामे शासकीय दरबारी वेळेत करण्यात यावीत विविध योजनांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दाखला ग्राह्य धरण्यात यावा सी सी आयबतर्फे होणारी कापूस खरेदी मध्ये पारदर्शकता आणावी ,इत्यादी मागण्यांसाठी आज किसान सभी मार्फत निवेदन देण्यात आले असून यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधवांचे सोबत संघटनेचे जिल्हा सल्लागार एडवोकेट मदन परदेशी, जिल्हा अध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष अडवोकेट संतोष पाटील, अर्जुन कोळी ,किशोर सूर्यवंशी, जितेंद्र देवरे, प्रमोद पाटील, लोटन पाटील, गुमान पावरा, रामचंद्र पावरा ,शिलदार पावरा ,कवरलाल कोळी, सचिन थोरात, कांतीलाल परदेशी, भरत सोनार, अनिल पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते


त राहण्याचे आवाहन मदन परदेशी,अर्जुन कोळी,हिरालाल परदेशी,संतोष पाटील   ,कीशोर सुर्यवंशी,रामचंद्र पावरा,कांतीलाल परदेशी,जितेंद्र देवरे,कवरलाल कोळी,प्रह्रार संघटनेचे बोरसे इत्यादी नी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने