शिरपूर प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील खामखेडा येथील 58 वर्षीय महिलेचा शेतीच्या वाटणीवरून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना दिनांक 25 डिसेंबर रोजी घडली आहे .याप्रकरणी एका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की खामखेडा येथील श्रीमती उषाबाई मगन धनगर व संजय धनगर वय 50 यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू आहेत .याबाबत न्यायालयात दावा देखील दाखल करण्यात आला आहे. दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास संजय धनगर दारूच्या नशेत श्रीमती उषाबाई धनगर यांच्या घराच्या अंगणात आले व त्यांनी शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी श्रीमती उषाबाई धनगर यांनी शिरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संजय धनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल ठाकरे करत आहेत
Tags
news
