मुक्काम आयसीयू कोविड वार्ड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांचे लेखन

 

शिरपूर प्रतिनिधी

शिरपूर येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर अमोल बागुल लिखित मुक्काम आयसीयू कोविड वार्ड या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. शहरातील करवंद नाका येथे आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या एस. एम. पटेल सभागृहात सकाळी 11 वाजता आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ जयश्री बेन पटेल असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी संजय यादव, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख व जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे उपस्थित राहणार आहेत.
 या वेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक गंगाधर अहिरे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुळे येथील कवी जगदीश देवपूरकर हे करणार आहेत.
मुख्याधिकारी अमोल बागुल हे नेहमीच मंद प्रभा फाउंडेशन च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांना वाचनाची व लिखाणाची प्रचंड आवड असून त्यातून प्रेरित होऊन त्यांनी मुक्काम आय सी यू कोविड वार्ड या काव्यसंग्रहाची निर्मिती केली आहे. यासाठी पुणे येथील सुमेध प्रकाशनाचे सहकार्य त्यांना लाभले आहे. विशेष म्हणजे अमोल बागुल यांना कोरोनाची लागण झाली होती  त्यावेळी त्यांना आलेले अनुभव त्यांनी या काव्य संग्रहातून शब्दात उतरवले असून त्यांचे हे अनुभवाचे बोल आहेत.
सदर कार्यक्रमास शहरातील लेखक-कवी यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागल यांनी केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने