स्वतःच्या पत्नी वर चाकू हल्ला करणाऱ्या हवालदार पतीवर गुन्हा दाखल




धुळे - घरगुती वादातून पत्नीवर चाकू हल्ला करणाऱ्या व मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार पतीविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सुरेखाबाई राकेश साळुंखे वय 45 राहणार प्लॉट नंबर 63 अजब नगर साक्री रोड धुळे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 .15   च्या सुमारास त्यांचे पती पोलीस हवालदार राकेश देवलाल साळुंखे नेमणूक मोहाडी पोलीस ठाणे धुळे यांनी मुलगा मुकेश राकेश साळुंके व सून चेतन मुकेश साळुंके हे गोड बोलतात अशी कुरापत काढून वाद घातला .सुरेखा बाई व मुकेश या दोघांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली तसेच सुरेखाबाई त्याच्यावर चाकूने हल्ला करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली यावरून राकेश साळुंखे यांच्याविरुद्ध धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने