रोहिणी ग्रामसभा कोष समिती व सर्वोदय आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री. कैलास पावरा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, योग्य दिशेने प्रयत्न केले तर आदिवासी विद्यार्थ्यांनाही मोठे यश मिळू शकते व ते अधिकारीहि बनू शकतात. तरी त्यादृष्टीने आपण चांगले प्रयत्न केले पाहिजेत. सदर प्रशिक्षण गावातील विद्यार्थ्यांना देण्याचा उद्देश असा होता की ,आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे वळावे त्यांची परिक्षांबाबत जाणीव जागृती व्हावी व त्यांनीही आपला टक्का शासनात वाढवावा या प्रशिक्षणा वेळी परिसरातील विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग मिळाला.
कार्यक्रमाप्रसंगी रोहिणी गावाचे सरपंच श्रीमती . मनीषा पावरा उपसरपंच श्री .
बंसीलाल बंजारा ,पोलीस पाटील श्री सुभाष पावरा तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री . पुनमचंद पावरा डॉक्टर आनंदराव पावरा श्री .बाचु बंजारा एडवोकेट भाईदास पावरा हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावाचे ग्रामसेवक श्री. मनोज कुमावत यांनी केले तर कार्यक्रमाचे उद्देश याविषयी सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष श्री .चेतन पाटील यांनी सविस्तर सांगितले. कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमात मान्यवरांचे आभार सर्वोदय संस्थेचे सचिव श्री. देवेंद्र पाटील यांनी मांडले
Tags
news
