पोलीस पाटील महासंघाच्या मराठवाडा उपाध्यक्ष पदी तपसे चिंचोलीचे दत्तात्रय पाटील यांची निवड



 
विशेष प्रतिनिधी :लक्ष्मण कांबळे

तपसे चिंचोली चे पोलीस पाटील श्री दत्तात्रय केशवराव पाटील याच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघाच्या दिनांक ७/डिसेंबर२०२० राजी झालेल्या कार्यकारणी च्या बैठकीत लातुर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील तपसे चिंचोली चे पोलीस पाटील श्री दत्तात्रय केशवराव पायील यांची सर्वानुमते  मराठवाडा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली . या निवडीचे पत्र संघटनेचे कार्याध्यक्ष तथा परभणी जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री बापू लिंबाजी नरहारे  यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. या  निवडीबद्दल तपसे चिंचोली येथे भव्यदिव्य सत्कार करण्यात आला यावेळी लातुर जिल्हा परिषद चे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते मा  महेशरावजी पाटील साहेब ,तसेच भिम आर्मी चे लातुर जिल्हा महासचिव  तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र  राज्य कोष्याधक्ष लक्ष्मण कांबळे, जयप्रकाश नाना सेलूकर., रावजीबाबा यादव ,जयराज पाटीलसाहेब, नितीनजी कवटाळे, बीबीशन गरड,  बालाजी तेलंग संतोष बिराजदार मनोज मुळे  गजानन गुरव  बसवराज पाटील  वसंत अंकुशे  संजय पाटील किशन भोळे राहुल घुले इंद्रजित पाटील मनोहर व्हनाळे नूर पठाण शिवाजी कवठाले अतिष घुले महादेव  पाटील गणेश बोबडे  भास्कर दळवे आदी गावातील अनेक नागरिकांनी  शाल श्रीफळ फेटा बांधून   दत्तात्रय पाटील यांचा सत्कार  करून पुढील भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या निवडीबदल दत्तात्रय पाटील यांचे सर स्थरातून यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने