शहादा तालुका प्रतिनिधी कृष्णा कोळी,
मो.9823983435
शहादा(नंदुरबार)राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख मा.शरदचंद्र पवार यांनी आपल्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेशी व कार्यकर्त्याशी लाईव्ह संवाद साधला.
आज संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीतर्फे मा.पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दशके कृतज्ञतेची हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला , कोरोनाच्या काळात संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्यात लाईव्ह संवाद साधण्यात आला होता.
नंदुरबार जिल्ह्यातर्फे शिवप्लाझा शहादा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
या कार्यक्रमात माजी आमदार ,जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व धुळे नंदुरबार जिल्हा प्रभारी अनिल गोटे, जिल्हा अध्यक्ष डॉ. अभिजित मोरे,जिल्हा उपाध्यक्ष शांतीला साळी
,तालुका अध्यक्ष डॉ.माधवराव पाटील,शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर ,ओबीसी सेलचे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत पाटील ,आमदार रोहित पवार फॅन क्लबचे जिल्हा अध्यक्ष राज बिरारे, नगरसेवक शेख इक्बाल ,युवती सेल जिल्हा अध्यक्ष दीपमाला पाटील, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ ,दिनेश पाटील, विनोद आहिरे, जगदीश माळी ,शुभम कुवर व तसेच ग्रामीण भागातील आलेले असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
