मोटारसायकल-सिलेंडर यांची काढण्यात आली मिरवणूक; मंत्री दानवेंच्या हकालपट्टीची केली मागणी
*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या प्रचंड वाढलेल्या किंमती, त्यामुळे होणारी प्रचंड महागाई तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शिंदखेडा तालुका शिवसेनेतर्फे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवून आंदोलन केले. यावेळी मोटरसायकल-सिलेंडर यांची प्रतिकात्मक मिरवणूक काढली. तसेच भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांप्रती केलेल्या वक्तव्याचा निषेध करुन दानवेंच्या पुतळ्याला जोडे मारत पुतळा दहन केला.
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या व ज्याच्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेला महागाईच्या खाईत लोटणारी बाब म्हणजे पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसेंदिवस कच्च्या तेलाचे भाव कमी होत असतांना व कोविडच्या परिस्थितीत सर्व सामान्य शेतकरी, शेतमजुर, कामगार, नोकरदार, व्यापारी यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत असतांना जिवन कसे जगावे? या विवंचनेत सर्व सामान्य असतांना केंद्रातील मोदी सरकार दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती भरमसाठ वाढवित आहे.
आज पेट्रोलच्या दराने नव्वदी पार केली आहे. भविष्यात शंभरी पार करेल. डिझेलच्या दराने ऐंशीचा टप्पा गाठला आहे. केंद्रान घरगुती गॅसची सबसिडी रद्द केली असून भाव देखीन दिवसेंदिवस वाढत आहेत. या बाबतीत सर्व सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप असुन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात. तसेच राजधानी दिल्लीत शेतकरी केद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधात गेल्या वीस दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. केंद्रातील मोदी सरकार शेतकरी विरोधी कायदे करुन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करीत आहे.
अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी भारतीय जनता पक्षाचे बेताल बादशहा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचे आंदोलनात चीन व पाकिस्तानचा हात असल्याचा अजब तर्क त्यांनी लावला. यापुर्वी देखील रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ''कितीही दिले तरी रडतात साले…..'' या पध्दतीने बेताल वक्तव्य केले होते. अशा माणसाला कृषीप्रधान देशाचा केंद्रीय मंत्री म्हणून राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांची मंत्री पदावरुन हकालपट्टी करावी, असे म्हणत दानवेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच मंत्री दानवेंच्या पुतळयाला जोडे मारत शिवसैनिकांनी पुतळा दहन केला.
यावेळी शिवसेनेचे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, तालुकाप्रमुख गिरीश देसले, विधानसभा संघटक छोटू पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील, दोंडाईचा कृ.उ.बा.स.संचालक सर्जेराव पाटील, समन्वयक विनायक पवार, शहरप्रमुख सागर देसले, गणेश परदेशी, प्रदीप पवार, विजय सिसोदे, हिरालाल बोरसे, नंदकिशोर पाटील, विश्वनाथ पाटील, संतोष पाटील, डॉ.भरत राजपुत, डॉ.हितेश वाडीले, विरपाल गिरासे, दोंडाईचा शहरप्रमुख चेतन राजपुत, उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, उपशहरप्रमुख दिपक मराठे, नितीन माळी, एस.डी.पाटील, अमृत भामरे, आर.आर.पाटील, एम.एस.जाधव, धनसिंग वसावे, शाम सोनवणे, प्रकाश साळुंके, भटू पाटील, विक्की पाटील, रविंद्र कोळी, सचिन पाटील, गणेश पाटील, सुकदेव बागुल आदी उपस्थित होते.
Tags
news
