शिरपूर प्रतिनिधी शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात राहणारा युवक प्रवीण भगवान माळी वय 43 यांनी आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 1 डिसेंबर रोजी समोर आली आहे .आज दुपारी 3 वाजता तापी नदीच्या पात्रात त्यांच्या मृत्यू तह आढळून आला आहे.
आज सकाळी सदरच्या तरुण आपली मोटरसायकल क्रमांक ए फ 34 43 सावळदे गावाजवळील तापी नदीच्या पुलावर जाऊन चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. त्याने माझ्या आत्महत्येस कोणासही जबाबदार धरू नये असे देखील नमूद केले आहे सदरची घटना समोर आल्यानंतर या युवकाच्या शोध घेण्यात आला व दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले उपजिल्हा रुग्णालय येथील वार्ड बॉय अशोक बिरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात या घटनेची आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.
Tags
news
