धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र विधान
परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी
8 ते सायंकाळी 5 या कालावधीत 99.31
टक्के
मतदान झाले, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी
संजय यादव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधान
परिषदेच्या धुळे- नंदुरबार स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी धुळे व
नंदुरबार जिल्ह्यातील तहसील कार्यालयात मतदान केंद्र कार्यान्वित करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या
पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रांवर वैद्यकीय पथक नियुक्त करण्यात आले होते.
या मतदान केंद्रांवर आज
सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरवात झाली. धुळे ग्रामीण तहसील
कार्यालयातील मतदान केंद्राला निवडणूक निरीक्षक सोनिया सेठी,
जिल्हाधिकारी
श्री. यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे,
उपविभागीय
अधिकारी भीमराज दराडे (धुळे) यांनी भेट देवून पाहणी
केली.
सकाळी 8
ते
मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी :
धुळे
ग्रामीण- 100, साक्री- 100, शिंदखेडा-
96.55, शिरपूर-
97.96, तहसील
कार्यालय, नंदुरबार- 100, नवापूर-
100, शहादा-
100, अक्राणी-
100, तळोदा-
100, अक्कलकुवा-
100. एकूण 99.31
टक्के.
