पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते वाटप
शिंदखेडा (प्रतिनिधी) : तालुक्यातील सुमारे 22 विधवा महिलांना शिवसेनेच्या प्रयत्नाने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे प्रत्येकी 20,000 रुपयांचे धनादेश आज दिनांक 4 डिसेंबर रोजी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री व पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत 22 महिलांना प्रत्येकी वीस हजार या प्रमाणे चार लाख 40 हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. प्राथमिक स्वरुपात शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या हस्ते या धनादेशांचे आज वाटप करण्यात आले. यामध्ये संगिता रविंद्र कोळी, सुरेखा प्रकाश बडगुजर, रंजना साहेबराव माळी, मीनाक्षी मनोज मराठे या विधवा महिलांना धनादेश देण्यात आले. याप्रसंगी युवासेनेचे गणेश परदेशी, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुकाप्रमुख संतोष देसले, उपतालुकाप्रमुख हिरालाल बोरसे, युवासेनेचे प्रदीप पवार, सरपंच रावसाहेब सैंदाणे, परमेश्वर वाल्हे, सुखदेव बागुल, स्वीय सहाय्यक दिपक जगताप, चंद्रसिंग ठाकूर आदी उपस्थित होते
दरम्यान शिंदखेडा तालुक्यातील कल्पना बबलू कोळी-कदाणे, आशाबाई बोलाराम भिल्ल-दभाशी, प्रतिभा आनंदा पाटील-झिरपे, संगीता प्रकाश मगरे-विरदेल, मंगलबाई हिम्मत कोळी-देगाव, शितल योगेश सोनवणे, सोनाली रवींद्र चौधरी-दाऊल, कमलबाई देविदास पाटील-नरडाणा, मिनाबाई बारकु गोसावी-डांगुर्णे, नेहा देविदास तिरमले-दोंडाईचा, ज्योतीबाई अंकुश भिल-तामथरे, अनिता पृथ्वीराज वाघ-जरवे, गायत्री राकेश गिरासे-मेथी, शोभाबाई शांताराम पाटील-तावखेडा प्रवे, ज्योती दीपक पानपाटील-टाकरखेडा, रंजनाबाई रतिलाल भिल-नरडाणा, अनिता सुनिल रामराजे-रहिमपूर, सुरेखाबाई भिका शिरसाट-खलाने या महिलांना पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या आदेशाने जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. दरम्यान राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी गणेश परदेशी व विनायक पवार, प्रदीप पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. दिपक जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.